Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register

जाहिरात

 

 पाथर्डी तालुक्यातील तिसगांव येथे,रस्ते अपघात तरुणाचा जागीच मृत्यु...    

schedule17 May 25 person by visibility 28 categoryकोल्हापूर

या बाबत सविस्तर वृत्त असे कि काल दिनांक 12 मे रोजी सोमवार रोजी  सायंकाळी 04:30  च्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून खासगी कार्यक्रमासाठी अहिल्यानगर ला जात असताना वादळी वारे आणि पाऊस याच्या पाश्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील तिसगांव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत  अपघातात शेवगांवच्या अनिस शकील  सय्यद वय 30 राहणार नाईकवाडी मोहल्ला या तरुणाचा जागीच मृत्यु झाला त्याच्या मागे पत्नी छोटी मुलगी  आई वडील असा परिवार होता. त्याच्या अचानक झालेल्या अकाली निधनाने शेवगांव शहरावर शोककळा पसरली आहे. मृताच्या नातेवाईकांचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व त्यांच्या सहकार्यांनी आज दुपारी 13 मे मंगळवार रोजी  भेटुन सांत्वन केले. या बाबत पोलीस स्टेशन  पाथर्डी  अकस्मात मृत्यु मृत्यु रजि नं-70/2025 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाण मा. वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी  हॉस्पिटल अहिल्यानगर
यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  अनिस शकीर सय्यद वय 32 वर्ष राहणार शेवगाव तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर आकस्मात मृत्यु घडला ती तारिख वेळ व ठिकाण - दि. 10/05/2025 रोजी  07/40 वा उपचारा दरम्यान उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे झाला दाखल गुन्ह्याचा तपास  अमंलदार- पो.ना. 432 सुखदेव धोत्रे पाथर्डी पोलीस स्टेशन हे पोलीस निरीक्षक संतोष आर.  मुटकुळे पाथर्डी पो. स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.  

[अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755
सामाजिक कार्यकर्ता पात्रकार

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes