प्रिया गवळी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
schedule17 May 25 person by visibility 556 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर : दिव्या कांबळे
आवड ही सहजासहजी जपता येणारी गोष्ट नाही , पण त्यासाठी जिद्द, चिकाटी, व धाडस यांची गरज असते. आणि आवड असेल तर सवड निघते हे सिद्ध करत आज आपली आवड जपत त्यामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करत यशाच्या शिखरावर पोहचणाऱ्या प्रिया गवळी यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने प्रिया गवळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रिया गवळी या ताराबाई पार्क कोल्हापूरच्या रहिवाशी असून त्यांचे शिक्षण बी.कॉम पर्यंत झाले आहे. अरस्ता बुटीक हे त्या स्वतः चालवत आहेत. या बुटिकच्या माध्यमातून साध्या रनिंग स्टीचपासून अरी वर्कपर्यंत क्रिएटिव्हिटी केली जाते. कर्नाटकमध्ये मिडल क्लास फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला, दहावीपर्यंत आई-वडिलांनी शिकवलं आणि दहावीनंतर बीकॉमचे पूर्ण शिक्षण त्यांनी स्वतः फॅशन डिझाईनिंगमधून केलं. त्यांना लहानपणापासून फॅशन डिझाइनिंगची आवड होती. वयाच्या पंधरा-सोळा वर्षीपासूनच स्वतःचे ड्रेस स्वतः शिवत. यातूनच त्यांना आवड निर्माण झाली. आणि फॅशन डिझायनिंगमध्ये आई ही त्यांची पहिली गुरु बनली. आईकडे बघत बघत फॅशन डिझाईनिंग त्या करू लागल्या.
दोन महिन्यांसाठी गेलेल्या इंटरशिपमध्ये त्यांनी स्वतःचे कलागुण दाखवले आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कोरोना काळात सुद्धा स्वतः गाळा मालकांनी सुद्धा त्यांना खूप सपोर्ट केला त्या काळात सुद्धा अरस्ता बुटीक कार्यरत होते. अडचणींवर मात करत आज त्या इथपर्यंत स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकल्या आहेत. आज दुकान चालू करून १५ वर्षे झाली आहेत. 2011 ऑगस्ट पासून अरस्ता बुटीक अखंडपणे कार्य करत आहे.
''या बुटीकमुळे शिकायला खूप मिळालं त्याचबरोबर स्वतःची आवड जपता आली हे सगळं करण्यासाठी कुटुंबाचा सपोर्ट खूप होता. टाईम मॅनेजमेंट करता आलं. मिस्टरांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. कॉन्फिडन्स न डगमगता काम कसं करावं, बिजनेस डील कसं करावं हे त्यांनी शिकवलं. आज मी त्यांच्यामुळेच आज इथवर पोहोचले आहे. इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो, माझी आई म्हणायची, आपलं जे ज्ञान आहे ते दुसर्यांना दिल पाहिजे तरच आपल्या ज्ञानात वाढ होते.''
प्रिया गवळी या स्वतःची आवड जपत कुटुंबाचा देखील सांभाळ करत स्वतःच अस्तित्व निर्माण करत आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपास येत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळाले आहे. लोकांशी चांगले नातेसंबध निर्माण झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेवून अनेक सामाजिक संस्था, मीडियाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.