Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात पेन्शन लोक अदालतीबाबत मार्गदर्शन संपन्नअवैध गर्भपात प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री ' ॲक्शन मोडवर '  कुंभोज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असून खुळाबा नसून तारांबासमृध्दी चव्हाण हिची अन्नसुरक्षा अधिकारी पदी निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे याचा सत्कार.कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे यासाठी प्रयत्नशील- आ.अमल महाडिक भव्य टेनिस बॉल वाईंगडे स्मृती चषक 2025 बक्षीस वितरण समारंभ तुकडी येथे केंद्रीय महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवीची भेट ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे  - जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर 26 जानेवारीला भारतीय संविधानवर प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये महापरीक्षा

जाहिरात

 

पेठवडगाव मध्ये राजकीय घडामोडीना वेग

schedule16 Nov 24 person by visibility 4074 categoryPolitics

कुंभोज प्रतिनिधी ; विनोद शिंगे

पेठ वडगाव व आसपासचे 30 ते 35 गावे व मोठा बाजारपेठ यामुळे पेठवडगाव मध्ये ज्याचा प्रचार मोठा त्याचा विजय निश्चित हा समजला जातो त्यातील पेठ वडगाव मध्ये राजकीय नेत्यांचा असणारा सहभाग गेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये यादव गट सालपे गट चौगुले गट हे तीन गट राजू बाबा आवळे यांच्या प्रचारासाठी कार्यरत होते या गटाने राजू बाबा आवळे यांना 6200 मत दिली आणि सुजित मिंणचेकर यांच्या यांच्या मागे वडगाव मधील युवकांचा एक मोठा गट म्हणजे राजवर्धन पाटील युवाशक्ती व सर्व सहकारी होते.

या गटाने आमदार मिणचेकर यांना 4600 मते दिली आणि अशोकराव माने बापू यांच्या पाठीशी मोहनलाल माळी हे होते व बापूंना 1370 इतकी मते मिळाली. सध्याच्या घडीला राजू बाबांचा प्रचार यादव आघाडी करत आहे व अशोकराव माने बापू यांचा प्रचार सालपे गट करत आहे सुजित मिंचेकर यांना काही सेनेचे पदाधिकारी मदत करत आहेत. हे पेठ वडगाव मधील सध्याचे वातावरण असताना सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे वडगावातील सर्वात मोठा युवकांचा गट राजवर्धन पाटील युवाशक्ती व कार्यकर्ते यांनी अजूनही कोणत्याही गटाचा झेंडा हातात घेतला नसल्यामुळे वडगावात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे त्यामुळे हा गट कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेतो त्यावर वडगावातील सर्वात जास्त लीड अवलंबून राहणार आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये या एकट्या गटाने तब्बल चार हजार सहाशे मतदान सुजित मिणचेकर यांना मिळवून दिले होते त्यामुळे या गटाच्या राजकीय निर्णयामुळे एक मोठी राजकीय घडामोडी पेठ वडगाव मध्ये होणार आहे या गटाचे कार्यकर्ते आसपासच्या 20 ते 25 गावांमध्ये असल्यामुळे या गटाच्या निर्णयावर आसपासच्या गावातील व पेठवडगाव मधील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes