पिंक ई - रिक्षा व रुपे कार्डचे शुक्रवारी वितरण
schedule06 Aug 25 person by visibility 9 categoryBusiness

कोल्हापूर, दि. 6: जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत पिंक (गुलाबी) ई-रिक्षा व रुपे कार्ड वितरण कार्यक्रम दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता ठरलेला होता. त्यामध्ये अंशतः बदल करण्यात आलेला असून हा कार्यक्रम दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता महासैनिक दरबार हॉल, सेवा रुग्णालय जवळ, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेकरीता पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना रिक्षाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली.