महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा सुधारित जिल्हा दौरा
schedule06 Aug 25 person by visibility 9 categoryPolitics

कोल्हापूर, दि. 6 : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कबनूरकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजता कबनूर येथे आगमन व श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणी समारंभास उपस्थिती. (स्थळ: रामरत्न मंगल कार्यालय, कोल्हापूर रोड, कबनूर) दुपारी 1.30 ते 2 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता कबनूर, ता. हातकणंगले येथून रुकडीकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता ॲड. श्री. अमितकुमार नानासाहेब भोसले, माजी उपसरपंच यांच्या निवासस्थानी भेट. (स्थळ: कर्मवीर कॉलनी, मु.पो.रुकडी, ता. हातकणंगले) दुपारी 2.30 वाजता रुकडी येथून बालकल्याण संकुलकडे प्रयाण. दुपारी 3.30 ते 4 वाजता जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर या संस्थेस भेट व पाहणी. (स्थळ: 1924/अ, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, बालकल्याण संकुल, कोल्हापूर) दुपारी 4.15 ते 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व कोल्हापूरी चप्पलबाबत महिला उद्योजिका व बचतगटातील महिलांसमवेत चर्चा. सायं. 5 ते 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) सायं. 6.30 वाजता श्री अंबाबाई दर्शन. मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून महासैनिक दरबार हॉलकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजता महिला लाभार्थ्यांना पिंक ई रिक्षा व रुपे कार्ड वितरण व माविमच्या बचतगटास धनादेश वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: महासैनिक दरबार हॉल, लाईन बझार, सेवा रुग्णालयजवळ, कोल्हापूर) दुपारी 12 वाजता वाहनाने सुतारवाडी, ता. रोहा, जि. रायगडकडे प्रयाण.