अजित पाटील हे देशासाठी 24 वर्षे प्रदीर्घ सेवा करून झाले सेवानिवृत्त
schedule06 Aug 25 person by visibility 21 categoryनोकरी

कांदे (ता.शिराळा ) येथील अजित रघुनाथ पाटील हे अकरा मराठा लाईफ इन्फंट्री बटालियन मधून देशासाठी 24 वर्षे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक (पापा) यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील,शिवाजी केन संचालक भोलासो पाटील, उपसरपंच संपत (छनू) पाटील, रघुनाथ पाटील, छगन पाटील, अशोक पाटील, विश्वास पाटील, धनाजी पाटील नाना पाटील राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
