Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानासाठी अर्ज करण्याचे आवाहनमध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट  प्रशिक्षणासाठी संपर्क साधाकोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी खुलाशहरात सापडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी संपर्क करावासमाज कल्याण अधिनस्त शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेश सुरुशनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना प्रवेशबंदीराज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारगणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्याजीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री – भरत गोगावलेकै. नानुबाई महादेव पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप

जाहिरात

 

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री – भरत गोगावले

schedule22 Aug 25 person by visibility 8 categoryBusiness

राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक असून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमि विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

साखर संकूल येथे आयोजित राज्यातील फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत श्री. गोगावले बोलत होते. बैठकीस  कृषि आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, संचालक, विस्तार व प्रशिक्षण रफिक नाईकवाडी, संचालक कृषिप्रक्रिया व नियोजन विनयकुमार औटे आदी उपस्थित होते.

श्री. गोगावले  म्हणाले, प्रत्येक विभागाची भौगोलिक परिस्थिती बघून त्यानुसारच कामकाज करावे. फलोत्पादन वाढीसाठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून विभागाचा महसूल वाढवावा. राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शासनाच्या रोपवाटीका  बळकट करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा. प्रत्येक रोपवाटिकेस काही ठरावीक खेळते भांडवल ठेवता येईल का या संदर्भात तपासणी करुन प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोकणामध्ये  मोठया प्रमाणावर सुपारीची लागवड होत आहे. परंतू सुपारी पीक भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समाविष्ठ नाही. या पिकाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा.  महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेंतर्गत परमीटवर शेतकऱ्यांच्या कलमे-रोपे पुरवठा केल्यानंतर त्याची कुशलची रक्कम शासकीय रोपवाटीकेस देण्या संदर्भात व खजूर या पिकाचा समावेश या योजनेमध्ये करण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी असल्याने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा संचालक फलोत्पादन अंकुश माने यांनी तर व्यवस्थापकीय संचालक अशोक किरनळळी, यांनी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनऔषधी वनस्पती मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनां संदर्भात सादरीकरण केले.

या बैठकीस ठाणे, नाशिक, पुणे छत्रपती संभाजीनगर, लातूर,  विभागांचे  विभागीय कृषि सह संचालक उपस्थित होते तर अमरावती व नागपूर विभागाचे  कृषि सहसंचालक दूरदुष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes