आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
schedule22 Aug 25 person by visibility 12 categoryBusiness

कोल्हापूर, दि. 22: राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह, पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत व जिल्हा परिषद कोल्हापूर मधील स्वनिधीतून आदर्श पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियान ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2025-2026 अंतर्गत राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
प्रस्ताव 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेत सादर करावा. प्रस्तावाची तालुका व जिल्हा स्तरावर पडताळणी होणार असून तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय उत्कृष्ट गोठ्यांची निवड करून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना मिळवण्याकरीता खालील QR CODE स्कॅन करावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी केले आहे.