Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register

जाहिरात

आशा शिंदे तळणीकर यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...

schedule17 May 25 person by visibility 831 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम

कोल्हापूर : दिव्या कांबळे 

मा. सौ. आशा रविंद्र शिंदे तळणीकर या नावामागे आहे तब्बल २५ वर्षांचा निरंतर सेवाभाव, निष्ठा आणि आरोग्य क्षेत्रातील अभूतपूर्व कार्य. नऊ मार्च 2000 रोजी त्यांनी आपली सेवा सुरु केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या परिसेविका म्हणून एक आदर्श आणि प्रेरणादायी कार्यकर्ती ठरल्या आहेत.आशा शिंदे तळणीकर यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने  आशा शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोविडच्या काळात जबाबदारीची खरी परीक्षा होती. वसाहत रुग्णालय, गांधीनगर हे नॉन-कोविड हॉस्पिटल असूनही, प्रारंभी येणाऱ्या संशयित रुग्णांची प्राथमिक तपासणी, उपचार व नंतर योग्य ठिकाणी रेफर करण्याचे काम सौ. आशा शिंदे यांनी अत्यंत धाडसाने केले. त्या काळात आवश्यक PPE kits, क्लोज, साहित्याची टंचाई असताना देखील जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या त्या योद्धा होत्या. त्यांच्या कार्यामुळे स्टाफमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला व रुग्णालयाची सेवा अखंड सुरु राहिली.
सौ. शिंदे यांनी केवळ रुग्णसेवाच नव्हे, तर रुग्णालय व्यवस्थापनाच्या व गुणवत्ता नियंत्रणाच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
वसाहत रुग्णालय, गांधीनगर येथे नॅशनल कॉलिटी इन्शुरन्स अंतर्गत "लक्ष्य प्लॅटिनम अवॉर्ड" मिळवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता.

सध्या त्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे परिसेविका म्हणून कार्यरत आहेत व तिथे NQAS, लक्ष्य, कायाकल्प, सुमन, मुस्कान यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांत नोडल ऑफिसर म्हणून अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ रुग्णांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या सदैव तत्पर असतात.सौ. आशा शिंदे या केवळ एक कर्मचारी नाहीत, तर समर्पित आरोग्यसेविका, व्यवस्थापन कुशल कार्यकर्ता आणि सामाजिक भान जपणारी जागृत नागरीक आहेत. त्यांची सेवा, कार्यक्षमतेची शिस्त, कठीण काळातील धैर्य आणि नवनवीन योजना यशस्वीपणे राबवण्याची क्षमता ही आजच्या आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यास व समर्पणास मानाचा मुजरा..!

आशा शिंदे तळणीकर यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...

schedule17 May 25 person by visibility 834 categoryकोल्हापूर

Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

Settings
Theme
themes