स्वाती मुकुंद पवार-चव्हाण यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
schedule17 May 25 person by visibility 99 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर :
स्वाती मुकुंद पवार-चव्हाण या नावामागे आहे एका शिक्षकाचा संकल्प, ज्यांनी गेली २५ वर्षे केवळ अध्यापन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मनोभावे कार्य केले आहे. शिक्षणात त्यांचा गाढा व्यासंग असून त्यांनी M.A. (अर्थशास्त्र, मराठी, इतिहास), B.Ed., M.Phil., Ph.D., आणि Advance Diploma in Counselling and Health Care ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. स्वाती पवार-चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने वैभव चौगले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या त्या बाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर येथे कार्यरत असून, विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. अध्यापनात त्यांनी संधी म्हणून घेतले आणि श्री. तात्याभादेव तेंडूलकर ज्यु. कॉलेज फॉर गर्ल्स, कोल्हापूर (MCVC विभाग) येथेही मराठी व जनरल फाऊंडेशन कोर्सचे अध्यापन केले आहे. 2023-24 साली अर्थशास्त्र विषयात केवळ 34 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल 2024-25 मध्ये 97, 96 आणि 95 गुणांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रवास म्हणजे त्यांच्या अध्यापन कौशल्याचे मूर्त स्वरूप आहे.
स्वाती मॅडम विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहिल्या आहेत. मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याअध्यापन सुलभ व समजेल अशा भाषेत करतात, कल्पक आकृत्यांद्वारे अवघड संकल्पनांची उकल करतात, प्रगतीशील बॅचेस तयार करून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवतात, छोट्या टेस्ट्स घेऊन विद्यार्थ्यांच्या सखोल आकलनावर भर देतात. विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढावा यासाठी त्या स्टेज डेअरिंग, निबंध लेखन, वक्तृत्व, भित्तीपत्रक, व्यक्तिमत्त्व विकास व सर्जनशील उपक्रम राबवतात. सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि भित्तीपत्रक विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ दिले आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्यांची जाणीव व्हावी यासाठी वृद्धाश्रम भेट, पर्यावरणपूरक उपक्रम अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. पालक-शिक्षक संवादासाठी त्या नियमित पालकभेटी आयोजित करतात आणि पाल्याच्या प्रगतीवर संवाद साधतात. ‘शब्द अंतर्यामी’ प्रकाशन संस्थेच्या संपादक मंडळाच्या सदस्य म्हणून त्या विविध विषयांवर लेखन करतात. वाचनप्रेम वाढवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाचन करून त्यावर चर्चा करण्यास प्रेरित करतात.
त्यांनी सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर येथील वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे. सकाळ NIE मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत "असा साधला संवाद" या विषयावर लेखनासाठी पारितोषिक प्राप्त झाले आहे. शाळेच्या शिस्तीसोबतच विविध गुणदर्शन, पाककला, चित्रकला व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेतात.
सौ. स्वाती मुकुंद पवार-चव्हाण या शिक्षक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक, सर्जनशील प्रेरणास्त्रोत आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षिका म्हणून समाजासमोर आदर्श ठरतात. त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळले असून, त्यांच्या शिकवणीतून आत्मभान आणि आत्मविश्वास यांचा प्रकाश निघतो. सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्यावतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!