हरिनाम सप्ताहास विराज नाईक यांची भेट
schedule03 Aug 25 person by visibility 38 categoryEntertainment

पणुंब्रे तर्फ वारुण (ता. शिराळा) येथील सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास आज विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री. बाबूराव हरी पाटील यांची पोलिस उप निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. पारायण मंडळातर्फे संचालक श्री. नाईक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठ चालक लहूदास महाराज, सागर पवार महाराज, विश्वास कारखाना संचालक शिवाजी पाटील, माजी सरपंच राजाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढेरे, राजू पाटील, नागेश बडदे, सोसायटीचे अध्यक्ष वाय. सी. पाटील, उपाध्यक्ष नानासो जाधव, माजी अध्यक्ष सुनील पाटील, रोहित ढेरे, विश्वास ढेरे, प्रकाश पाटील, बाळू पाटील, संदीप पाटील, अनिल देसाई, अजय पाटील, विकास पाटील, विश्वास पाटील, बंटी पाटील, सर्जेराव पाटील, सदाशिव देसाई, संभाजी जाधव आदी यांच्यासह भाविक, भक्त मंडळी उपस्थित होती.
