'त्या' स्कूटीमुळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार चर्चेत आले!
schedule07 Aug 25 person by visibility 16 categoryPolitics

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे त्यांच्या स्कूटरवरूनच्या प्रवासामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. कारण मंगळवारी हेब्बल फ्लायओव्हर (Hebbal Flyover) लूपची पाहणी करताना त्यांनी वापरलेल्या स्कूटीवर एकूण 18,500 रुपये दंड आकारण्यात आल्याचे समोर आलं आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी शिवकुमार यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये ते KA04 JZ2087 नोंदणी क्रमांक असलेली होंडा डिओ चालवताना दिसत होते. "चांगले बेंगळुरू बनवण्याच्या आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, हेब्बल फ्लायओव्हर लूप उघडणार आहे, ज्यामुळे सुरळीत आणि जलद वाहतूक सुनिश्चित होईल," असे त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले होतं.
जेडीएसने केला मुद्दा उपस्थित
दरम्यान, याच मुद्दयांवर बोट ठेवत जेडीएसने (JDS) टीका करत हे प्रकरण उचलून धरलंय. कर्नाटक राज्य पोलिस (केएसपी) अॅप तपासल्यावर असे आढळून आले की, या स्कूटरवर तब्बल 18,500 रुपये किमतीचे 34 वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चालान प्रलंबित होते. जेडीएसने ट्विटरवर हा मुद्दा उपस्थित केला आणि इतक्या मोठ्या रकमेचा दंड न भरल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांवर (Karnataka Deputy CM) टीका केली. त्यानंतर वाहनाचा मालक असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दंडाची रक्कम भरली.
यावरवरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचेम्हणणेकाय?
एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, तपासणीदरम्यान डीके शिवकुमार आणि मागे बसलेल्या चालकाने घातलेले हेल्मेट नियमांनुसार नव्हते. त्यांनी सांगितले की तपासणीदरम्यान घातलेले हेल्मेट बेकायदेशीर आहेत. तसेच, सध्या आम्ही अशा प्रकरणांमध्ये जनतेवर दंड आकारत नाही. आम्ही फक्त लोकांना असे हेल्मेट वापरू नये, अशी विनंती करतो. हे विधान नियम आणि सरावातील फरक दर्शवते. म्हणजेच, नियमांनुसार, हेल्मेट बेकायदेशीर आहे, परंतु अद्याप प्रभावी अंमलबजावणी पूर्णपणे अंमलात आणली जात नाही.
हाफ हेल्मेट बेकायदेशीर का आहेत?
भारत सरकारच्या वतीने बीआयएस (Bureau of Indian Standards) द्वारे प्रमाणित केलेले हेल्मेटच कायदेशीररित्या ओळखले जातात. हाफ हेल्मेट डोक्याला पूर्ण संरक्षण देत नाहीत. यामुळे अपघातादरम्यान गंभीर दुखापत होऊ शकते. अशा प्रकारे, ते बीआयएस नियमांचे उल्लंघन करतात.