कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी महादेवी हत्तिणीचा नांदणी मठामध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला
schedule07 Aug 25 person by visibility 9 categoryकोल्हापूर

कोल्हापूरमधील महादेवी हत्तिणीचा नांदणी मठामध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महादेवीला परत नांदणी मठात पाठवण्यासाठी वनताराने सकारात्मकता दर्शवली आहे. नांदणी मठापतींसोबत झालेल्या बैठकीत वनताराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. नांदणी मठामध्ये महादेवीसाठी घर आणि इतर वैद्यकीय सोईसुविधा देणार असल्याचे वनताराच्या टीमने सांगितले आहे. महादेवीला परत आणण्यासाठी केलेल्या याचिकेलाही वनताराच्या टीमने पाठिंबा दिला आहे. एका व्यक्तीने सांगितले की, "हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं, जहां माधुरी वापिस अपने कोल्हापूर वासियो और फॅमिली के पास वापिस आ सकती है." वनतारा, स्वामीजी आणि महाराष्ट्र सरकार एकत्र येऊन महादेवीला कोल्हापूरवासियांसोबत राहण्यासाठी आवश्यक सुविधा देतील. तसेच, महादेवीला परत कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी हायकोर्ट आणि कोर्टात अर्ज देणार असल्याचेही स्पष्ट केले. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेत वनताराने हत्तीच्या पालनपोषणाचे सुविधा केंद्र उभारण्याचे मान्य केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हत्तीची पूर्ण मालकी मठाकडेच राहील. देखभाल व्यवस्था आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक वनतारा पुरवेल. एकंदरीत समाधानकारक चर्चा झाली असून, हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वनताराने सहकार्य करत राहावे अशी अपेक्षा आहे. अनंत अंबानी आणि त्यांच्या परिवाराने या भूमिकेला पूर्ण आशीर्वाद दिला आहे.