महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावेत
schedule07 Aug 25 person by visibility 7 categoryBusiness

कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व या महामंडळाअंतर्गत विविध इतर मागास प्रवार्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केल्या असुन कोल्हापूर जिल्हा स्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आले आहे. या महामंडळ व उप कंपन्यांमार्फत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सहा योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना पुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असुन इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. उर्वरित बीजभांडवल योजना व थेट कर्ज योजना ऑफलाईन स्वरुपाच्या असुन त्याचे अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.
अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका (ताराराणी चौका जवळ), कोल्हापूर दुरध्वनी क्रमांक 0231-2653512 वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.