माधुरी हत्तीच्या समर्थनात कुंभोज ग्रामस्थांचा मूक मोर्चा
schedule04 Aug 25 person by visibility 42 categoryकोल्हापूर

माधुरी हत्तीच्या समर्थनात कुंभोज ग्रामस्थांचा मूक मोर्चा
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
कुंभोज, ४ ऑगस्ट सांगली जिल्ह्यातील कुंभोज गावात आज सकाळी माधुरी हत्तीच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एक मूक मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो नागरिक, विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत, सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या या शांततापूर्ण आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत काही स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्तीच्या जंगलातील हालचाली आणि तिला होणारा त्रास यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. वनविभागाकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आपला आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.
मोर्चाचे नेतृत्व गावातील जैन समाजाचे ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत कुंभोज आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. मोर्चादरम्यान कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. हातात फलक घेऊन 'माधुरीला वाचवा', 'प्राण्यांना जगू द्या', 'वन्यजीव संरक्षण आमची जबाबदारी' असे संदेश देणारे फलक ग्रामस्थांनी धरले होते. यावेळी कुंभोज मराठा महासंघाग व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने सदर आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
स्थानिक नागरिक या.सरपच सौ. अरुणा पाटील म्हणाल्या, "माधुरी आमच्यासारखीच या गावाचा एक भाग आहे. तिला हानी पोहोचवली जात असेल, तर आम्हाला गप्प बसता येणार नाही. आम्ही वनविभागाला निवेदनही दिलं आहे."यावेळी महाविकास आघाडीचे घटनेते किरण माळी, अनिल भोकरे ,प्रकाश पाटील समीर भोकरे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दिगंबर जैन बोर्डिंग चे संचालक अनिल पाटील शरद कारखाना संचालक आप्पासाहेब चौगुले जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले , राजाराम कारखाना संचालक अमित साजनकर कुंभोज ग्रामपंचायत उपसरपंच आप्पासाहेब पाटील, माजी सरपंच बापूसाहेब पाटील, माजी सरपंच अनिकेत चौगुले, आदित्य पाटील, संतोष भोकरे, विनायक पोद्दार,अभिनंदन चौगुले, सुभाष पाटील, संभाजी मिसाळ ,सदाशिव महापुरे, सत्यजित तोरस्कर, सुरेश भगत, भरत भगत ,बाळासाहेब शिंदे सचिन कोळी शिवसेना शहराध्यक्ष दीपक कोळी तसेच सर्व धर्मातील प्रमुख मान्यवर मंडळी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हा मूक मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला असून, पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता.