सीपीआर मधील मनोविकृती चिकित्साशास्त्र बाह्यरुग्ण विभागाचे स्थलांतर
schedule27 Nov 24 person by visibility 235 categoryHealth

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सद्यस्थितीत विविध इमारतींच्या दुरुस्तीचे व नुतनीकरणाचे काम सुरु आहे.
त्यामुळे या रुग्णालयामधील तळमजला, सरस्वती इमारत येथील मनोविकृती चिकित्साशास्त्र बाह्यरुग्ण विभागाचे (Psychiatry OPD) नुतनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा विभाग तात्पुरत्या स्वरुपात याच इमारतीमधील पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.