सोशल मीडियावर फोटो शेअर करुन प्राजक्ता गायकवाडनं चाहत्यांना दिला सुखद धक्का
schedule05 Aug 25 person by visibility 29 categoryEntertainment

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली. तेव्हापासून ती अवघ्या महाराष्ट्रात छत्रपतींची युवराज्ञी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. ज्यावेळी विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा रिलीज झाला, त्यावेळी त्यातल्या येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाला पाहून सर्वांना प्राजक्ताचीच आठवण झाली, अक्षरशः दोघींची तुलना करुन प्राजक्ताच बरी, अशी प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिलेली. अशातच आजही लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्राजक्ता गायकवाडन आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेले. त्या फोटोंमध्ये पाहुण्यामंडळींच्या गराड्यात प्राजक्ता बसलेली दिसली. तसेच, प्राजक्तानं पारंपरिक साज केलेला. हे फोटो पाहून प्राजक्ताचं ठरलं, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेल्या. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षावही सुरू केला. पण, प्राजक्तानं मात्र यासंदर्भात कोणताही खुलासा केला नव्हता. अशातच आता प्राजक्तानं तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करुन प्राजक्तानं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.