गडहिंग्लज साखर कारखान्यात तब्बल २९ कोटींचा गैरव्यवहार
schedule13 Dec 24 person by visibility 200 categoryकोल्हापूरPolice Diary

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात तब्बल २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापुरकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर प्रकरण: यात ११ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. आधुनिकीकरण, विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमितता या सर्व प्रकरणांमध्ये साखर कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, पोलिसांनी तपास सुरू केला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये कारखान्याचे काही वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित घटकांचा समावेश आहे.