राजर्षी शाहू मध्ये महाराष्ट्र दिन साजरा...
schedule02 May 25 person by visibility 24 categoryकोल्हापूर

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये पेपर वाहन चालक आदर्श स्वच्छता दूत म्हणून विजय डोंगळे व बाबू पाटोळे यांचा शाळेचे केंद्रप्रमुख केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांचे असते सत्कार करण्यात आला .
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्य साधून के टी एस परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्याबद्दल प्रणित प्रशांत पाटील याचा सत्कार " आदर्श कामगार आरोग्य मित्र " विजय डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व ध्वजवंदन त्यांच्याच हस्ते करण्यात आले प्रसंगी आरोग्यमित्र बाबू पाटोळे यांचा सत्कार उत्तम कुंभार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीते यांनी करण्यात आली .
आरव दाभाडे यांनी पाहुण्यांना आमंत्रित केले व आराध्या काळे पायल पाटील यांनी भाषणे केली शाळेचे केंद्रमुख्याध्यापक यांनी महाराष्ट्र दिन याचे महत्त्व सांगितले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड ,दिपाली चौगले, प्रभुदास दाभाडेे ,आरव चौगले ,नलिनी पाटोळे वेतन पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमासाठी आसमा तांबोळी ,तमेजा मुजावर, मिनाज मुल्ला,सावित्री काळे हेमंत पाटोळेे ,उत्तम पाटील ,विद्या पाटील, शीतल पाटील, दीपाली यादव,बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रसाद दाभाडे यांनी मानले.