पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
schedule03 May 25 person by visibility 98 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर : दिव्या कांबळे
यश ही सहाजासहजी मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडस यांची गरज असते. हे सर्व गुण आत्मसात असलेल्या पल्लवी अर्जुण गायवाड यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने पल्लवी गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पल्लवी गायकवाड या हातकणंगले तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण ११ वी कॉमर्स पर्यंत झाले आहे. उमेद अभियान हातकणंगले पंचायत समिती यामध्ये सीआरपी या पदावर त्या सध्या कार्यरत आहेत. उमेद अभियान हे महिलांच्यासाठी काम करते. या अभियानाच्या माध्यमातून त्या गावो-गावी बचतगट निर्माण करणे, गरजू महिलांच्या हाताला काम देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे, बँकांकडून कर्ज स्वरुपात भांडवल उपलब्ध देऊन अर्थसहाय्यक व्यवसाय निर्मिती करुन देणे, व्यवसाय कसा करावा, कोणता करावा, याचे प्रशिक्षण देणे, शासनातर्फे आलेल्या सोयीसुविधा महिलांपर्यंत पोहचवणे आदी सर्व कामे उमेद अभियानाच्या माध्यमातून केली जातात. अभियानामध्ये पल्लवी गायकवाड या सीआरपी पदावर कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया पल्लवी गायकवाड यांनी खोची गावामध्ये जत्रेच्या निमित्ताने सुरु केलेले भैरवनाथ कलकशन आज मोठ्या दिमाखात उभे आहे. याठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे ड्रेस, मटेरियल, साड्या उत्तम दर्जाच्या मिळतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळाले आहे. लोकांशी चांगले नातेसंबध निर्माण झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेवून अनेक सामाजिक संस्था, मीडियाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.