धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
schedule05 May 25 person by visibility 91 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर : बालाजी कदम
शिक्षण क्षेत्रात त्याचबरोबर सामाजिक कार्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत शिस्तबद्ध वर्तवणूक जिद्द, चिकाटी, व धाडस करत स्वतःच अस्तित्व निर्माण करत, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडत त्यांना उच्च स्तरावर पोहचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या धनश्री जोशी यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहु स्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने धनश्री जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धनश्री जोशी या प्रतिराज गार्डन कॉलनी, गंगाई लॉन चौक, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूरच्या रहिवाशी असून त्यांचे शिक्षण बी.कॉम , डी .एड पर्यंत झाले आहे. आता सध्या फर्स्ट स्टेप इंग्लिश मेडीयम स्कूल कोल्हापूर येथे प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य घरात जन्म घेऊन एक चांगली व्यक्ती आणि चांगली शिक्षिका म्हणून ओळख असलेल्या सौ. धनश्री जोशी यांचे वडील प्रकाश आरडे, कोल्हापूर महानगरपालिका येथे 36 वर्ष विविध विभागात नोकरी करून निवृत्त झाले. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षांपासून व्यायामाचे प्रशिक्षण घेऊन 40 वर्ष गांधी मैदान व्यायाम शाळेत व्यायाम करून तिथे येणाऱ्या मुलांना फ्री मध्ये व्यायामाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी समाजकार्यात आवड म्हणून भागात झाडे लावून भाग सुधारणा हा उपक्रम राबविला.आपल्या वडिलांचा आदर्श मनामध्ये ठेवून वयाच्या 18 व्या वर्षा पासून नोकरी करत धनश्री जोशी यांनी शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर 10 वर्षे विविध भागात जाऊन महिलांना स्वयंपाक कलेचे प्रशिक्षण दिले. शिक्षण क्षेत्रात आवड असल्यामुळे बरीच वर्षे शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य केले. या कार्याची दाखल घेत 2024 मध्ये दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये त्यांचा कर्तृत्वान महिला म्हणून सत्कार करण्यात आला.
सध्या समाजात शिक्षण क्षेत्रात होणारी लूट, लोकांची फसवणूक हे सर्व पाहून धनश्री जोशी यांनी मिस्टरांची मदत घेऊन स्वतः फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कुलची स्थापना केली. येथे वय वर्षे 3 -6 वयोगटातील मुलांना शिकवले जाते. सामान्य लोकांना सुद्धा इंग्लिश मेडीयम शिक्षण घेता यावे हा उद्देश ठेवून कमीत कमी एकदम वाजवी दारात ह्या स्कूलची फी भरून शिक्षण दिले जाते. भरमसाठ वाढलेली शालेय फी मुळे सामान्य लोकांना इंग्लिश माध्यम शिक्षण घेणे अवघड झाले आहे. पण इंग्लिश येणे हे काळाची गरज आहे. म्हणून एक सामाजिक कार्य म्हणून ही शाळा काढली आहे. शालेय शिक्षणासोबत इतर कला सुद्धा मुलांना अवगत असाव्यात म्हणून मुलांना फ्री मध्ये लाठी काठी, नृत्य चे प्रशिक्षण दिले जाते. तसेच शालेय शैक्षणिक सहल मुलांनसाठी मोफत आहे.
धनश्री जोशी या शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आपली सेवा अहोरात बजावत असतात तसेच कुटुंबाचा देखील तितक्याच आपुलकीने सांभाळ करतात. आज त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केल आहे, त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळाले आहे. लोकांशी चांगले नातेसंबध निर्माण झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेवून अनेक सामाजिक संस्था, मीडियाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...