Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न... पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर

जाहिरात

 

संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...

schedule05 May 25 person by visibility 25 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
 
कोल्हापूर :निशा आऊजी 
 
सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत जिद्द, चिकाटी, व धाडस करत स्वतःच अस्तित्व निर्माण करत, लोकांना मदतीचा हात देऊ करून यशाच्या शिखरावर पोहचणारे संकेत सोनवणे यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहु स्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने संकेत सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
संकेत सोनवणे हे एकता गल्ली, मौजे वडगाव, कोल्हापूरचे रहिवाशी असून त्यांचे शिक्षण बी.कॉम अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेकनेशियन थेटर पर्यंत झाले आहे. आता सध्या एस.एस फोंडेशनमध्ये अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. एका सामान्य कुटुंबात जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. लहानपणापासूनच कठीण परिस्थितीत परिस्थीची जाणीव त्यांना होती. समाजाप्रती काहीतरी देण्याच्या भावनेतून एस.एस फोंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना त्यांनी केली असून या संस्थेद्वारे अनेक आतापर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत, ज्यामध्ये वृक्षारोपण मोहिमा,रक्तदान शिबिरांचे आयोजन, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, वैद्यकीय मदतीची व्यवस्था, यासारख्या सामाजिक कार्यांचा समावेश आहे. याशिवाय, संकेत सोनवणे हे राजकीय क्षेत्रातही सक्रिय असून, भारतीय जनता पक्ष (भाजप) या पक्षात तालुका हातकणंगले पंचायत राज विभागामध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकसेवेसाठी ते सदैव तत्पर आहेत. सामाजिक कार्याबरोबरच ते स्वतःला खुश ठेवण्यासाठी संगीत क्षेत्रातून आपली आवड जपत असतात. तबला वादन करतात, चित्रकला आणि सृजनात्मक अभिव्यक्ती त्याचबरोबर फिरायला जाणे आणि नवीन ठिकाणांचा अनुभव ते घेत असतात. 
 
 ''माझा जन्म एका सामान्य पण संघर्षमय कुटुंबात झाला. आई घरकाम करून कुटुंबासाठी रात्रंदिवस परिश्रम करत होती, तर वडील MIDC मध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या कठोर मेहनतीने आणि त्यागामुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे. आर्थिक अडचणींना न घाबरता, अनेक संकटांना सामोरे जात मी शिक्षण आणि स्वतःचा विकास घडवून आणला. आई-वडिलांनी दिलेल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या संस्कारांवर मी माझे जीवन आधारले आहे.''
                     
संकेत सोनवणे हे सामाजिक क्षेत्रात आपली सेवा अहोरात बजावत असतात तसेच कुटुंबाचा देखील तितक्याच आपुलकीने सांभाळ करतात. आज त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केल आहे, त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळाले आहे. लोकांशी चांगले नातेसंबध निर्माण झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेवून अनेक सामाजिक संस्था, मीडियाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes