केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती जनतेला द्यावी ; डॉ अनिरुद्ध पिंपळे
schedule20 Nov 24 person by visibility 190 categoryHealth
पन्हाळा: केंद्र व राज्य शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेचे आयोजन करून यशस्वी करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून वैद्यकीय अधिकारी व सामुदायिक आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सर्व योजनांची जनतेला माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी नॅशनल क्वालिटी अश्युअरन्स स्टडर्ड पूर्वतयारीच्या भेट प्रसंगी ते बोरपाडळे तालुका पन्हाळा येथे बोलत होते.
यावेळी त्यांनी परिसर स्वच्छता अंतर्गत स्वच्छता सौर ऊर्जा सीसीटीव्ही कॅमेरे सुसज्ज औषध भांडार लॅब बायोवेस्ट तसेच रुग्णसेवा चांगली असल्याबाबतचे बोलून दाखवले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिल्या कणसे, डॉक्टर सोनिया कदम,डॉक्टर प्रियांका साबळे,एम बी चौगुले,अमर पाटील, सचिन पाटील,अशोक खाडे - पाटील,पंडित भास्कर, जयवंत कोरे सामुदायिक आरोग्य अधिकारी , फार्मासिस्ट,लॅपटेक्निशन , आरोग्य सेवक, एलएचव्ही , एएनएम , जीएनएम ,गटप्रवर्तक, आशासेविका, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले तसेच आभार संपत पाटील यांनी मानले.
बोरपाडळे (प्रतिनिधी)- श्रीकांत कुंभार