इचलकरंजीत खळबळ; वकिलाकडून महिलेचा विनयभंग
schedule10 Dec 24 person by visibility 165 categoryPolice Diary
इचलकरंजी: इचलकरंजीत एका महिलेचा लोखंडी हातोड्याने पाठलाग करत शिवीगाळ केल्याच्या आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली दत्ता वडर या वकिलावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित दत्ता वडर यांनी पीडित महिलेचा पाठलाग केला आणि तिचा हात जबरदस्तीने पकडून विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर वडर यांनी दुचाकीतून आणलेला लोखंडी हातोडा काढून धमकी देत शिवीगाळ केली.
महिलेने या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना वडर यांनी तिचा रस्ताही अडवला. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात वकिल दत्ता वडर यांच्यावर विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे इचलकरंजीत खळबळ उडाली असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.