ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेत बनावट पेढे जप्त: अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई
schedule01 Aug 25 person by visibility 24 categoryकोल्हापूर

दक्खनचा राजा जोतिबा च्या यात्रेमध्ये बनावट पेढे जप्त करण्यात आले आहेत. श्रावण षष्ठी यात्रेदरम्यान बनावट पेढे विकणाऱ्यांचा सुळसुळाट समोर आला. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. जप्त केलेल्या बनावट पेढ्यांची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे आणि ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगड यांच्या सतर्कतेमुळे हा बनावट पेढेविक्रीचा प्रकार उघडकीस आला. डफळापूर येथील उत्तम शिंदे यांच्याकडून खरेदी केलेला पेढा, बर्फी आणि हलवा हा माल सदाशिव वारेकर, गणेश वारेकर, पोपट वारेकर आणि फारुख बजरवाड यांनी जोतिबा डोंगरावर विक्रीसाठी आणला होता. दरम्यान, खवा आणि अन्य मेवा मिठाईचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पदार्थ तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहेत.