खळबळजनक ! भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण करून खून
schedule10 Dec 24 person by visibility 65 categoryPolice Diary
पुणे : पुण्यात सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या सख्ख्या मामाचे अपहरण करून खून केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तींचं नाव सतीश वाघ (वय 55) असून त्यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत आढळला आहे. ते हडपसर परिसरातील मांजरी भागात हॉटेल्स, लॉन्स, आणि शेती व्यवसायात कार्यरत होते. अपहरणाच्या घटनेत चार जणांनी सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांना जबरदस्तीनं एका चारचाकी वाहनात डांबून नेले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सतीश वाघ यांना दोन महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलं आहेत. शांत स्वभावाचे असलेल्या वाघ यांचं कुणाशीही वाद नव्हता, त्यामुळे त्यांच्या अपहरण व खुनाच्या कारणांबाबत पोलिस तपास सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या नातेवाइकावर झालेल्या हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात या प्रकरणामुळे प्रचंड खळबळउडाली आहे.