कोल्हापुरात दिव्यांग लाभार्थ्यांना साहाय्यक साहित्यांचे वाटप - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule02 May 25 person by visibility 18 categoryकोल्हापूर

कोल्हापूर - मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आज कोल्हापुरात दिव्यांग लाभार्थ्यांना साहाय्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, साधना कांबळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख अमेय जोशी आदी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे सहाय्यक साहित्य, व्हीलचेअर्स, श्रवणयंत्राचे वितरण करण्यात आले. यामुळे दिव्यांग नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.