सहाय्यक अभियंता ऐश्वर्या पाटील हिचा सत्कार
schedule03 Aug 25 person by visibility 49 categoryनोकरी

वाटेगाव (ता. वाळवा) येथील कुमारी ऐश्वर्या पाटील हिची सहाय्यक अभियंता (वर्ग-२) महापारेषण महाराष्ट्र शासन येथे निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी कु. ऐश्वर्याला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, संयुक्त पाणीपुरवठा संस्थेचे संचालक प्रदीप चव्हाण, वडील नंदकुमार पाटील, आई वैशाली पाटील, आजी श्रीमती उषा पाटील, संभाजी पाटील, दिलीप नांगरे, अशोक पाटील, पांडुरंग जाधव, धोंडीराम कुंभार आदी उपस्थित होते.