इस्रोची आणखी एक कामगिरी! GSAT-20
schedule19 Nov 24 person by visibility 74 categoryTechnology
दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने सोमवारी रात्री GSAT-20 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. हा उपग्रह एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीने फ्लोरिडातील केप कॅनवेरल येथून अंतराळात पाठवण्यात आला.
GSAT-20 उपग्रह, ज्याला GSAT-N2 असेही म्हणतात, हा भारताचा सर्वाधिक क्षमता असलेला थ्रूपुट कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. 4700 किलो वजनाचा हा उपग्रह दुर्गम भागांमध्ये डेटा आणि इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. हा उपग्रह विशेषतः भारतीय उपखंडात इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
इस्रोच्या स्वतःच्या GSLV मार्क-3 प्रक्षेपण वाहनाची क्षमता जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 4000 किलो वजन वाहून नेण्याची आहे. मात्र GSAT-N2 चे वजन 4700 किलो असल्यामुळे इस्रोने स्पेसएक्ससोबत व्यावसायिक करार करून प्रक्षेपणासाठी फाल्कन 9 रॉकेटचा वापर केला.
GSAT-20 चे तांत्रिक वैशिष्ट्य
- कामकाजाचा बँड: केए बँड
- विकासकर्ता: न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (इस्रोची व्यावसायिक शाखा)
- उद्देश: दुर्गम भागांमध्ये उच्च गतीची इंटरनेट सेवा प्रदान करणे