अजित पाटील सैन्यातून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार
schedule01 Aug 25 person by visibility 280 categoryनोकरी

कांदे (ता. शिराळा) : येथील अजित रघुनाथ पाटील हे २४ वर्षाच्या सेवेनंतर सैन्यातून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ पार पडला. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या निमित्ताने श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच रोहित शिवजातक, उपसरपंच संपतराव पाटील, नानासो भडकिमकर, अनिल पवार, रघुनाथ पाटील, गजानन पाटील, सुभाष पाटील, केदार चव्हाण, ज्ञानदेव पाटील, किरण पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
