विद्यार्थ्यांनी देशासाठी उच्च शिक्षण घ्यावे - मा.निवृत्ती साळोखे सर
schedule15 Aug 25 person by visibility 138 categoryEducation

दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मनपा. राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र.11 कसबा बावडा कोल्हापूर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दुडय्या गनिकोप्पा, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शितल पाटील, कांचन हुलस्वार,सोनाली गणेशाचार्य, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षअनुराधा गायकवाड, केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार भिमराव पाटील सर्व शिक्षक, विद्यार्थी,सेवक उपस्थित होते.
प्रथम पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्या. डॉक्टर अजितकुमार पाटील ,प्रमुख पाहुणे निवृत्ती साळोंखे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी, पालक या सर्वांच्या उपस्थितीत या शाळेचे माजी विद्यार्थी निवृत्ती साळोंखे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर संगीतमय कवायत सादर केली.
याचबरोबर आदित्य कांबळे,अमृता ठोंबरे,वेदिका गणेशाचार्य,श्रावणी पवार,जानवी दळवी, आराध्या पवार, सई चव्हाण, अखिलेश चौगुले, किमया चौगुले या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
कार्यक्रम प्रसंगी सतीश मोरे यांनी विद्यार्थ्यांना केळी वाटप व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुडय्या गनिकोप्पा व अभिजित मोहिते यांनी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप केले.
*आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.रावसाहेब कीर्तीकर सर यांनी केले. श्री. उत्तम कुंभार सर यांनी प्रास्ताविक केले.शाळेचे मुख्या. डॉक्टर अजितकुमार भिमराव पाटील व प्रमुख पाहुणे निवृत्ती साळोंखे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवर, पालक ,विद्यार्थी, शिक्षक, सेवक यांचे श्री.अमित पोटकुले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
