Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक मिरवणूकीवर लक्ष ठेवून ‘झेप प्रतिष्ठान’ च्या आरती पुस्तिकेचे थाटात प्रकाशन एकट्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती तब्बल 930 कोटी!बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या घरावर छापा, बायकोने 20 लाखांच्या नोटा जाळल्या, बाथरुमचा पाईप तुंबलामटण महाग का झालं? सुप्रिया सुळेंच्या मटणाच्या वक्तव्यावरून राऊतांचा पलटवारमहिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाईसर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पणगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभोज येथे पोलिसांचा रूट मार्चदसरा महोत्सवासह शिव शाहूंच्या विचार कार्याचा होणार जागर

जाहिरात

 

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक मिरवणूकीवर लक्ष ठेवून 

schedule06 Sep 25 person by visibility 250 categoryकोल्हापूर

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक मिरवणूकीवर लक्ष ठेवून 

पारंपारिक वाद्यात ‘बाप्पा’ला निरोप देण्यासाठी जनसागर रस्त्यावर 

एकनाथ पाटील- स्पीड न्यूज वृत्तसेवा 

कोल्हापूर -गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात कोल्हापूरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस उत्साही आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. स्वत: जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता विसर्जन मिरवणूकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंंदीर, पापाची तिकटी परिसरात फेरफटका मारला. अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये विसर्जन मिरवणूक सुरु आहे. 
 
शहरातील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वाररोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा, तलवार चौक, या शहरातील मुख्य मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका सुरु आहेत. ढोल, ताशे, लेझीम, लाऊडस्पिकरसह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता. विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्साह वाखाणण्यासारखा आहे. महिलांचे लेझीम पथक आकर्षक ठरत आहे. अनेक मंडळांनी सामाजिक प्रश्नांवरील देखाव्याचे प्रदर्शन मिरवणूकीमध्ये केल्याचे दिसून येत आहे. सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या मिरवणूकीला सायंकाळी चार वाजता रंग चढला. गणेश भक्तांची गर्दी ओसंडून वाहू लागल्याने वातावरण भक्तीमय बनले आहे. मध्यरात्री बारा पर्यंत ध्वनीक्षेप लावण्यात येणार आहेत. त्यानंतर बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

महिलांची छेडछाड होवू नये, चोरट्यांना लगाम घालण्यासाठी मिरवणूक मार्गावर टेहाळणी मनोरे उभे करण्यात आले आहेत. यावर दोन पोलीस खडा पहारा देवून दुर्बीणीमधून सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. साध्या वेशातही पोलीसांची विविध पथके सर्वत्र फिरत आहेत. विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनातर्फे तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

अवघी पंढरी अवतरली....

मिरवणूकीमध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांचे देखावे आकर्षक ठरत आहेत. टाळ मृदुंगाच्या आवाजात माऊलीचा गजर, धनगरी ढोल, बेंजो यामुळे विसर्जन मार्गावर भक्तीचा सागर ऊसळल्याचे पाहायला मिळत आहे.  

डॉल्बीचा ठेका 

विसर्जरण मिरवणूक मार्गावर काही मंडळांनी डॉल्बी आणि लेसर लाईट प्रकाशझोतचा वापर केला आहे. डॉल्बीच्या ठेक्यावर तरुण बेधुंद नाचत आहेत. पोलीसांचे विशेष पथक आवाजाची तपासणी करीत आहे. 

स्वागत कमानी 

विसर्जन मिरवणूकीमध्ये बिनखांबी गणेश मंदीर ते गंगावेश दरम्यान महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी स्वागत कमानी उभ्या केल्या आहेत.
या प्रसंगी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी मात्र स्वागत कमान्यांची रेलचेल पाहून नागरिकांच्यात मात्र चर्चेचा विषय बनला आहे. 

हेल्थ चेकअप 

मिरवणूकीमध्ये गणेश भक्तांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांना आरोग्याचा प्रश्न समोर आला तर तत्काळ त्यांचेवर उपचार करता यावेत यासाठी ठिकठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये महापालिका आरोग्य विभागासह सामाजिक संघटनांनी सहकार्य लाभत आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes