‘झेप प्रतिष्ठान’ च्या आरती पुस्तिकेचे थाटात प्रकाशन
schedule25 Aug 25 person by visibility 284 categoryEducation

‘झेप प्रतिष्ठान’ च्या आरती पुस्तिकेचे थाटात प्रकाशन
देवाळे हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांची यशस्वी झेप
पन्हाळा : येथील देवाळे विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या १९९५-९६ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘झेप प्रतिष्ठान पन्हाळा’ या संस्थेच्या लोगो अनावरण आणि श्री गणेश आरती पुस्तिका प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला. शाळेचे मुखाध्यापक नंदकुमार नलवडे आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य समीर घोरपडे यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी शाळेचे शिक्षक, झेप चे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यातील देवाळे हायस्कुलच्या माजी विद्यार्थींनी फक्त स्नेहमेळाव्याला एकत्र न येता १९९५-९६ दहावी बॅचच्या सुमारे १४० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘झेप प्रतिष्ठान पन्हाळा’ या नावाची सामाजिक सेवा संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, कला-क्रीडा, वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रात काम करण्याचा मानस पदाधिकाºयांचा आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष महादेव कांबळे, सचिव शशिकांत कांबळे, खजानिस भारत पाटील, सदस्य राजेंद्र गराडे यांच्या बुद्धीकौशल्यातून नुकतीच श्री गणेश आरती पुस्तिका काढण्यात आली आहे. या पुस्तिकेचा प्रकाशन आणि संस्थेच्या नावाचा लोगो अनावर सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन देवाळे हायस्कुल येथे करण्यात आले होते. शाळेचे मुखाध्यापक नंदकुमार नलवडे यांनी १९९५-९६ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी खूप चांगली संकल्पना राबवली आहे. त्यांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातील माजी विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा आहे. प्राचार्य समीर घोरपडे यांनी माजी विद्यार्थ्यांनी झेप प्रतिष्ठान पन्हाळा नावाची संस्था सुरु करुन आदर्श समाजासमोर ठेवला आहे. भविष्यात ही संस्था यशस्वी झेप घेईल असा विश्वास असल्याचे सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी ‘झेप प्रतिष्ठान पन्हाळा’ संस्था भविष्यात कशाप्रकारे वाटचाल करणार आहे याची माहिती दिली. आभार सचिव शशिकांत कांबळे यांनी मानले. यावेळी सुमारे एक हजारपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आरती पुस्तिका मोफत भेट देण्यात आली.

















