समृध्दी चव्हाण हिची अन्नसुरक्षा अधिकारी पदी निवड
schedule22 Jan 25 person by visibility 68 categoryकोल्हापूर
सावर्डे गावच्या शिरपेच्या पुन्हा एकदा मानाचा तुरा सावर्डे ता.हातकणगले येथील कु. समृद्धी नितीन चव्हाण राहणार सावर्डे तालुका हातकणंगले हिने महाराष्ट्र राज्यसेवा 2023 या परीक्षा अंतर्गत अन्न व औषध विभागात अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्रित .या पदाकरिता निवड झाली असून महाराष्ट्र राज्यातून २०२ पदाकरिता परीक्षा झाली होती. त्यामध्ये एकूण उमेदवारांमधून २६ वी. रॅके ने. उत्तीर्ण झाली असून 2022 मध्ये बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी मध्ये पदवी प्राप्त केली होती त्यानंतर राज्यसेवेची अन्न व प्रशासन विभागांमध्ये निघाली नंतर सदरचे यश प्राप्त केली असून तिने क्लासेसच्या मदतीने घरीच अभ्यास करून हे यश संपादन केले.
या आजोबा विष्णू खंडू चव्हाण वडील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन विष्णू चव्हाण तसेच कुटुंबीय व शिक्षक वर्ग मोलाचे सहकार्य मार्गदर्शन व पाठबळ मिळाले. समुद्धी चव्हाण हिच्या अधिकारी पदी निवड झाल्याची बातमी समजता समस्त सावडी ग्रामस्थांनी फटाक्याची आताषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरातील अनेक मान्यवरांच्या वतीने समुध्दी हिला शुभेच्छा देण्यात आल्या.
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)