डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे याचा सत्कार.
schedule22 Jan 25 person by visibility 52 categoryकोल्हापूर
पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे याचा सत्कार.
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार सायली मराठे यांचा आज पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते डॉ. डी.वाय. पाटील संकुलन, गारगोटी येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॅम्पसचे डायरेक्टर विजयकुमार घोलपे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना कोल्हापूर जिल्हा सहसचिव इंद्रजीत मराठे, कोजीमाशीचे माजी संचालक संजय पाटील, भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, मुख्याध्यापक बबन इंदुलकर, एन. जी. कांबळे, डी. पी. पाटील
उपस्थित होते.
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)