कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे यासाठी प्रयत्नशील- आ.अमल महाडिक
schedule22 Jan 25 person by visibility 30 categoryकोल्हापूर
कोल्हापुरातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. पण कोल्हापुरात पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने या तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागते. ही बाब ओळखून कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे अशी मागणी जोर धरत आहे. राज्य शासनाने शेंडा पार्क येथे 35 हेक्टर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित ठेवली आहे परंतु ही जागा अद्याप हस्तांतरित झालेली नाही. या संदर्भात आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आमदार अमल महाडिक यांच्या समवेत पार पडली.
शेंडा पार्क इथल्या जागेच्या हस्तांतरणासोबतच महाराष्ट्र राज्याच्या आयटी धोरणा संदर्भात विस्तृत चर्चा झाली. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत व्यापक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुढी पाडव्यापूर्वी कोल्हापुरातील आयटी पार्क चा प्रश्न निकाली काढण्याचा विश्वास यावेळी उपस्थितांना दिला.
आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव राहुल मेंच, खजानिस रणजीत नार्वेकर, फाउंडर प्रेसिडेंट अँड डायरेक्टर शांताराम सुर्वे, विश्वंभर भोपळे उपस्थित होते.
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)