महावीरच्या समर्थ पाटील ची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड साठी निवड
schedule22 Jan 25 person by visibility 34 categoryकोल्हापूर
महावीरच्या समर्थ पाटील ची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड साठी निवड
महावीर महाविद्यालयातील १ महाराष्ट्र बॅटरी एनसीसी युनिट मधील छात्र कॅडेट समर्थ कृष्णात पाटील यांची 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड व पंतप्रधान रॅली साठी निवड झाली आहे. कोल्हापूर या ठिकाणी चार शिबिरे व पुणे या ठिकाणी चार शिबिरात अत्यंत उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर कॅडेट समर्थ पाटील यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड 2025 साठी निवड झाली.
कॅडेट समर्थ पाटील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या गावचा रहिवाशी असून तो महावीर महाविद्यालयात बी.एस.स्सी भाग १ या वर्गात शिकत आहे. संस्थेचे चेअरमन ॲड. के ए कापसे, सचिव एम.बी गरगटे, लेफ्टनंट कर्नल एम. मुठांना, माजी प्राचार्य आर.पी लोखंडे, प्र.प्राचार्या डॉ उषा पाटील,कॅप्टन उमेश वांगदरे, सुभेदार मेजर शिवा बालक, हवालदार डि के राव, हवालदर योगराज, हवालदार सरोज ,हवालदार रमन्ना याचें प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.