Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक मिरवणूकीवर लक्ष ठेवून ‘झेप प्रतिष्ठान’ च्या आरती पुस्तिकेचे थाटात प्रकाशन एकट्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती तब्बल 930 कोटी!बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या घरावर छापा, बायकोने 20 लाखांच्या नोटा जाळल्या, बाथरुमचा पाईप तुंबलामटण महाग का झालं? सुप्रिया सुळेंच्या मटणाच्या वक्तव्यावरून राऊतांचा पलटवारमहिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाईसर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पणगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभोज येथे पोलिसांचा रूट मार्चदसरा महोत्सवासह शिव शाहूंच्या विचार कार्याचा होणार जागर

जाहिरात

 

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला अन् स्पा सेंटरचा भांडाफोड झाला; दोन मुली अन् दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले

schedule14 Aug 25 person by visibility 104 categoryPolice Diary

नांदेड शहरातील वजीराबाद परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वैश्या व्यवसायाचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर छापा टाकून धंद्यात गुंतलेल्या महिलांसह अनेकांना अटक केली. हा प्रकार नांदेडमधील गजबजलेल्या तरोडेकर मार्केट परिसरात उघडकीस आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वजीराबादमधील तरोडेकर मार्केटमधील फ्युजन स्पा सेंटर काही महिन्यांपासून सुरु होते. स्पा सेवांच्या नावाखाली येथे अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी नांदेड पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला. संबंधित ग्राहकाला ठरलेल्या पद्धतीने स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ग्राहकाने आत जाऊन खात्री पटवून घेतल्यानंतर लगेचच पोलिसांना संपर्क साधला.
यानंतर पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. छाप्यात दोन तरुणी आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. त्याचबरोबर, या ठिकाणाहून आणखी एका महिला, तीन युवती, चार पुरुष तसेच स्पा सेंटरचा चालक आणि कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी काही रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

 

पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. वजीराबादसारख्या व्यापारी आणि वर्दळीच्या भागात असा अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची बातमी पसरताच स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं असून अशा ठिकाणांवर नियमित देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नांदेड पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, शहरातील स्पा, मसाज पार्लर आणि सलून यांची तपासणी मोहीम सुरू आहे. नियमांचे उल्लंघन किंवा अनैतिक व्यवसाय सुरु असल्याचं आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावी, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

साधूंच्या वेशात आले, 'रक्षा' बांधून महिलेला भुरळ घातली अन्

नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत साधूंच्या वेशातील तीन भामट्यांनी ‘दीक्षा’ घेण्याच्या बहाण्याने एका महिलेला भुरळ घालून तब्बल 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes