औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी पीएम नॅशनल अप्रेंटशीप मेला
schedule08 Aug 25 person by visibility 32 categoryनोकरी

कोल्हापूर, दि. 7 : जिल्ह्यात पीएम नॅशनल अप्रेंटशीप मेला (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार, दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय येथे आयोजित केला आहे. मेळाव्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, बारावी पास. बारावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. आवटे व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां), एम.आर.बहिरशेट यांनी केले आहे.