महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
schedule15 Aug 25 person by visibility 120 categoryEducation

कोल्हापूर दि. 15 : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या शाळेमध्ये भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे स्मरण ठेवून भारताला जगात अधिक बलाढ्य बनवण्यासाठी सर्वांनी आपण ज्या क्षेत्रात कार्य करत आहोत त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत राहिले पाहिजे. आपल्या कार्यातून व कृतीतून राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती जोपासली पाहिजे. असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष श्री. बी. जी. बोराडे यांनी व्यक्त केले. यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेचे चेअरमन डॉ.के. जी. पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी ध्वजारोहणा नंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर केले. एन.सी.सी, आर.एस.पी, स्काऊट गाईड या पथकांनी ध्वजाला सलामी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.यु. आर. आतकिरे यांनी तर आभार उपप्राचार्या सौ. व्ही एस.कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री संदीप पाटील यांनी केले.
या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. डी. जी. किल्लेदार, खजाननीस श्री. वाय. एस. चव्हाण, संचालक श्री. पी. के. पाटील, आजीव सेवक श्री. उदय पाटील, संस्थेचे सेक्रेटरी श्री.एस. जे. मेटील, शाळेचे उपमुख्याद्यापक श्री. एस. एस. मोरे, पर्यवेक्षक श्री. एस. ए. जाधव श्री. एस. व्ही. शिंदे, क्रीडा विभागप्रमुख श्री प्रदिप साळोखे, संस्थेच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख, विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.