Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात पेन्शन लोक अदालतीबाबत मार्गदर्शन संपन्नअवैध गर्भपात प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री ' ॲक्शन मोडवर '  कुंभोज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असून खुळाबा नसून तारांबासमृध्दी चव्हाण हिची अन्नसुरक्षा अधिकारी पदी निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे याचा सत्कार.कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे यासाठी प्रयत्नशील- आ.अमल महाडिक भव्य टेनिस बॉल वाईंगडे स्मृती चषक 2025 बक्षीस वितरण समारंभ तुकडी येथे केंद्रीय महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवीची भेट ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे  - जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर 26 जानेवारीला भारतीय संविधानवर प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये महापरीक्षा

जाहिरात

 

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्वाची बैठक

schedule10 Dec 24 person by visibility 192 categoryEducation

कोल्हापूर : बोर्ड परीक्षेची सर्वंकष माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच येणाऱ्या परीक्षेची आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने विभागातील प्रत्येक जिल्ह्यात दोन टप्प्यात बैठकांचे आयोजन केले असल्याची माहिती कोल्हापूर मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सभेवेळी पूर्वतयारी करुनच प्राचार्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. 

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढविणे आणि परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय मंडळाने तिन्ही जिल्ह्यात दोन टप्प्यात शाळाप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन केले आहे. या  सभा साताऱ्यात 11 व सांगलीत 12 डिसेंबर रोजी होणार आहेत.

कोल्हापूर विभागीय मंडळाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त करुन निकालातील गुणवत्ता वाढवण्याचा मनोदय पदभार घेतेवेळी व्यक्त केला होता, त्या दृष्टीने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांच्या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेची परीक्षेच्या अनुषंगाने प्रशासकीय, शैक्षणिक, तांत्रिक माहिती मुख्याध्यापक सभेसाठी विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी मागवली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

येत्या मंगळवारी सकाळ सत्रात सकाळी 11 ते 1 वाजता आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले व कागल या सात तालुक्यांची तर दुपार सत्रात 3 ते 5 वाजता करवीर, कोल्हापूर शहर, पन्हाळा, राधानगरी, शाहुवाडी व शिरोळ या सहा तालुक्यांची सहविचार सभा कोल्हापुरात होणार आहे. 

शाळा परिसर व वर्गातील सीसीटीव्ही, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतची माहिती, नोंदणी व शिक्षण संक्रमण मासिक, चालू वर्षीच्या परीक्षार्थी संख्येत झालेली वाढ किंवा घट, राज्य मंडळ व विभागीय मंडळ संकेतस्थळाचा वापर, मंडळाच्या मोबाईल ॲपचा विद्यार्थी व शिक्षकांकडून वापर, मागील वर्षाच्या निकालाची टप्पेनिहाय माहिती, उल्लास साक्षरता कार्यक्रमातील शाळेचा सहभाग, स्कूल प्रोफाइल, परीक्षक- नियामक, योग्यता व पात्रता प्रमाणपत्र, प्रात्यक्षिक परीक्षेची पूर्वतयारी, शास्त्रीय व लोककला संस्थांची माहिती, खेळाडू एनसीसी स्काऊट गाईड मधील वाढीव गुणांबाबत, प्रीलिस्ट दुरुस्ती, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रयोगवही बाबतची माहिती, टंचाईग्रस्त व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबाबत यासह अनुषंगिक बाबींची शाळाप्रमुख यांनी पूर्वतयारी करुन माहितीसह उपस्थित रहावयाचे आहे. शाळांनी बैठकीपूर्वी एक तास उपस्थित राहण्याच्या सूचना कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिल्या आहेत. अनुपस्थित राहिल्यास लेखी कारणे द्यावी लागणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes