श्री सिद्धनाथ राईस मार्टला विराज नाईक यांची सदिच्छा भेट
schedule22 Aug 25 person by visibility 21 categoryBusiness

शिराळा : येथे प्रज्योत कानकात्रे यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री सिद्धनाथ राईस मार्ट ला विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. प्रज्योत कानकात्रे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. व्यवसायास शुभेच्छा दिल्या. राईस मार्ट मध्ये विविध जाती व प्रकारचे तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय इतर कडधान्ये व स्वयंपाकासाठी लागणारे लसूण, कांदे आदी वस्तू उपलब्ध आहेत. त्यांची पाहणी अध्यक्ष श्री. नाईक यांनी केली. यावेळी अजय जाधव, ॲड. अक्षय कदम, प्रवीण कानकात्रे, सुरज सदाफळे, साई कानकात्रे, ऋतुराज जाधव, तुषार यादव, शुभम कणुंजे आदी उपस्थित होते.
