देशभरात ड्रायव्हरलेस बस सुरू होणार
schedule15 Aug 25 person by visibility 58 categoryTechnology

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने आपल्या कॅम्पसमध्ये देशातील पहिली पूर्णपणे Artificial Intelligence (AI) वर चालणारी ड्रायव्हरलेस बस सेवा सुरू केली आहे. टेक्नोलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन (TiHAN) या केंद्रात तयार करण्यात आलेल्या या बस स्मार्ट मोबिलिटीचा (Smart Mobility) नवा अध्याय सुरू करत आहेत. या अत्याधुनिक बसमुळे केवळ कॅम्पसमधील प्रवास सोपा होणार नाही, तर भारतातल्या Autonomous Vehicles क्षेत्रातही नवे युग सुरू झाले आहे.
TiHAN च्या प्रो. पी. राजलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखालील टीमने या Self driving Electric Shuttles चे यशस्वी डिझाइन करण्यात आलं आहे. हे प्रोजेक्ट सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत 10,000 हून अधिक प्रवाशांनी या बसचा प्रवासाचा अनुभव घेतला. त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक जणांनी त्यावर समाधानाची (Customer Satisfaction) भावना व्यक्त केली आहे. 6-सीटर व 14-सीटर अशा दोन प्रकारात या ड्रायव्हरलेस बस उपलब्ध आहेत.
सुरक्षित आणि सहज प्रवासाची हमी
या Autonomous Buses मध्ये Automatic Emergency Brake, Adaptive Cruise Control आणि अडथळा ओळखणारी Sensor Technology असल्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित बनतो. बस आपल्या मार्गावर अचानक समोर येणाऱ्या व्यक्ती, वाहन किंवा अडथळ्याची जाणीव करून आपली गती आपोआप कमी-जास्त करू शकते. या तंत्रज्ञानाला Technology Readiness Level (TRL)-9 प्रमाणपत्र मिळाले आहे, म्हणजेच या बसचे चाचणी तास भारतीय रस्त्यांवर (Real Road Testing) यशस्वीरीत्या पार पडले आहेत.
देशभरात ड्रायव्हरलेस बस सुरू होणार
हा प्रकल्प फक्त IIT कॅम्पसपुरती मर्यादित नसून, TiHAN आता देशातील पहिला Automatic Driving Test Track विकसित करत आहे. Indian Road Conditions मध्ये ऑटोनॉमस तंत्रज्ञानाची तपासणी करता येणार आहे. या सुविधेमुळे देशातील कंपन्या व संशोधन संस्थांना (Research & Development) आवश्यक डेटा व इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे.
याचबरोबर TiHAN द्वारे AI आणि Machine Learning क्षेत्रात नवे इनोव्हेटर्स तयार करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण मोड्यूल तयार केले जात असून, भविष्यात भारताला Global Tech Competition मध्ये सक्षम बनवणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
एकूणच IIT हैदराबादची ही AI चालित ड्रायव्हरलेस बस सेवा भारतातील स्मार्ट ट्रान्सपोर्ट (Smart Transport) क्षेत्रात Game Changer ठरण्याची शक्यता आहे.