दिग्दर्शक नागराज मंजुळे वादाच्या भोवऱ्यात
schedule27 Nov 24 person by visibility 71 categoryEntertainment
कोल्हापूर : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या अचूक दिग्दर्शन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांसाठी ओळखले जातात. मात्र, आता ते त्यांच्या नवीन चित्रपटाच्या कथेसंदर्भात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित असलेल्या "खाशाबा" चित्रपटाची कथा वादग्रस्त ठरली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी दावा केला आहे की खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क २००१ पासून त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे नागराज मंजुळे यांनी त्यांच्या परवानगीशिवाय चित्रपट तयार केल्याचा आरोप केला आहे.
संजय दुधाणे यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, आणि निर्माती ज्योती देशपांडे यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीवर आणि प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स बजावले आहे.
चित्रपटाच्या हक्क आणि साहित्यिक मालमत्तेच्या उल्लंघन संदर्भात संजय दुधाणे यांच्या वतीने अॅड. रविंद्र शिंदे आणि अॅड. सुवर्णा शिंदे यांच्याकडून दावा करण्यात आला आहे .