सावधान! अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला, पावसाचा जोर किती राहणार ?
schedule19 Aug 25 person by visibility 44 categoryHealth

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी, तसेच रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे . आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील तीन ते चार तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने सर्व मच्छीमारांना प्रशासनाने धोक्याच्या सूचना दिल्या असून सतर्कतेचा इशाराही दिलाय.
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसांच्या सरी कोसळत आहेत .किनारपट्टीवर ही जोरदार पाऊस सुरू आहे .वाऱ्याचा वेग वाढला आहे .मुंबईच्या समुद्राला उधाण आले आहे .भरतीची वेळ रात्री आठ 53 ची आहे आणि समुद्रात 3.14 मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे .
अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला
अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहणार असून तो प्रती ताशी 70 कि.मी.पर्यंत (उत्तर महाराष्ट्र) तसेच ताशी 45 ते 55 कि. मी.राहणार असून ताशी 65 कि. मी.(दक्षिण महाराष्ट्र) वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.