Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात पेन्शन लोक अदालतीबाबत मार्गदर्शन संपन्नअवैध गर्भपात प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री ' ॲक्शन मोडवर '  कुंभोज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असून खुळाबा नसून तारांबासमृध्दी चव्हाण हिची अन्नसुरक्षा अधिकारी पदी निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे याचा सत्कार.कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे यासाठी प्रयत्नशील- आ.अमल महाडिक भव्य टेनिस बॉल वाईंगडे स्मृती चषक 2025 बक्षीस वितरण समारंभ तुकडी येथे केंद्रीय महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवीची भेट ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे  - जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर 26 जानेवारीला भारतीय संविधानवर प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये महापरीक्षा

जाहिरात

 

चक्क हॅलिकॉप्टरमधून सासरला चालली महाराष्ट्राची लेक

schedule26 Nov 24 person by visibility 368 categoryTravel

जळगाव:  जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अनोखा आणि आलिशान लग्नसोहळा पार पडला आहे. प्रगतशील शेतकरी भिकन रामचंद्र परदेशी यांची नात प्रिया हिचा विवाह सोमवारी चाळीसगावच्या कोदगाव चौफुली येथे मोठ्या थाटामाटात झाला. या लग्नाची चर्चा सध्या चाळीसगावसह पंचक्रोशीत रंगली आहे.


नवरदेव चेतन ठाकूर, संभाजीनगर येथील प्रतिष्ठित व्यावसायिक, यांनी आपल्या पत्नीला घरी नेण्यासाठी सरप्राईज दिले. त्यांनी चक्क हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टरद्वारे नववधू प्रियाचा निरोप घेण्याची ही घटना गावकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरली. रांजणगाव येथील समस्त ग्रामस्थ प्रियाला निरोप देण्यासाठी हॅलिपॅडवर मोठ्या उत्साहात जमले होते.

प्रियाला निरोप देताना रांजणगावमधील ग्रामस्थ आणि तिच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. हेलिकॉप्टर उडताना ग्रामस्थांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे भावी वैवाहिक जीवन आनंदाने आणि सुखाने भरले जावे, अशी प्रार्थना केली.

या लग्नासाठी दोन्ही कुटुंबीयांनी मोठ्या तयारीने आणि आनंदात सहभाग घेतला. विवाह सोहळ्याला परिसरातील मान्यवर मंडळी, नातेवाईक, आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.हा अनोखा लग्नसोहळा चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांना चांगलाच संस्मरणीय ठरला आहे. नववधूला हेलिकॉप्टरने घेऊन जाण्याचा हटके उपक्रम सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes