संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरला अटक
schedule04 Jan 25 person by visibility 33 categoryPolitics
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते.
संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना पळवून लावण्यात संभाजी वायबसेची महत्वाची भूमिका होती. डॉ संभाजी वायबसे यानेच पळून जाण्यात मदत केल्याच समोर आलं आहे. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव आहे. वाल्मिक कराड हाच या प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडचा प्रभाव असल्याची चर्चा होते. म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.