सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जिल्हा दौरा
schedule06 Aug 25 person by visibility 12 categoryPolitics

कोल्हापूर, दि. 6: गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.55 वाजता शासकीय विश्रामगृह येथून बहुउद्देशीय सभागृह, रमणमळाकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता कोल्हापूर जिल्हा महसूल कल्याण निधी, बहुउद्देशीय सभागृह, रमणमळा येथे आगमन व वि.का.स. सेवा संस्थाचे संगणकीकरण व केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गट सचिवांच्या कार्यशाळेस उपस्थिती. (स्थळ : बहुउद्देशीय हॉल, रमणमळा) दुपारी 1 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 ते 4.30 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील पक्ष कोअर कमिटी पदाधिकारी यांच्यासोबत बैठक. (स्थळ : पक्ष कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर) दुपारी 4.30 ते 6 वाजता मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती प्रमाणपत्रे देणे तसेच पक्ष प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा. (स्थळ : पक्ष कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर) सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.40 वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री अंबाबाई मंदिराकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता श्री अंबाबाई देवीचे दर्शन. सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनकडे प्रयाण. सकाळी 10. 30 ते दुपारी 12 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 38 व्या स्मृतिदिन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, ताराबाई पार्क, कोल्हापूर) दुपारी 12 ते 2 वाजता गृह, सहकार, शिक्षण, गृहनिर्माण व खनिकर्म विभागासंदर्भात आढावा बैठक. . (स्थळ : समिती सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर) दुपारी 2 ते 3 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 4.35 वाजता विमानाने बेंगलुरुकडे प्रयाण.