डीएलएड परीक्षेच्या गुणपडताळणी व छायाप्रत मागणीसाठी 20 ऑगस्ट पर्यंत करा अर्ज
schedule06 Aug 25 person by visibility 19 categoryEducation

कोल्हापूर, दि. 6 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डीएलएड जून 2025 परीक्षेचे दि. 3 ते 12 जून 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepunein) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यशावकाश हस्तपोच मिळेल. उत्तरपत्रिकेच्या गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी दिनांक 20 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.