Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
विष्णू शिंदे यांच्या 'दावण' कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार...पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया... वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले प्रवीण तरडेपरिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका... शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी... संजय राऊतांचा धुळे येथील कॅशकांड प्रकरणात कुणावर गंभीर आरोप...  वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया... प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट... आवळीतील धरणाची दुरुस्ती करणेची ग्रामस्थांची मागणी...

जाहिरात

 

पन्हाळा हळहळला ! विजेच्या धक्क्याने मायलेकराचा मृत्यू

schedule29 Jun 23 person by visibility 3239 category

पन्हाळा : आज आषाढी एकादशी दिवशी पन्हाळा तालुक्यातून एक दुःखद घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील नेबापूर हद्दीत तुटलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आणि तुटलेल्या विजेच्या तारांकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे या दोघांचा बळी गेल्यामुळे लोकांमधून संतापाची प्रतिक्रिया येत आहे. त्याचबरोबर त्या मायलेकराबद्दल नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची सखोल चौकशी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेकाला वाचविताना आईचा ही अंत 
अजिंक्य हा सकाळी सात च्या सुमारास स्वमालकीच्या शेतात मशागतीची कामं करण्यासाठी गेला होता. वेळ झाला म्हणून आई मुलाला बघण्यासाठी शेतात गेली त्यावेळी हातात विद्युत तार पकडलेल्या अवस्थेत मुलगा अजिंक्य निपचित पडलेला दिसला. घाबरून आईने धावत जाऊन मुलाला स्पर्श करताच तिला सुद्धा विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती ही गतप्राण झाली. आजूबाजूला असणाºया शेतकºयांनी आरडाओरडा केल्याने घटना कळली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पन्हाळा पोलीसांत या घटनेची नोंद आहे. 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes